वैजापूर, (प्रतिनिधी): बेकायदेशीर रित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी शहरात ही कारवाई केली.
फारुख महंमद शेख (रा. दर्गाबेस, वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलीसांनी २६०० रुपयांचा माल पोलीसांनी जप्त केला आहे. वैजापूर शहरात प्राणघातक ठरत असलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारुन ही कारवाई केली.
आरोपीच्या प्रतिबंधीत असलेला नायलॉन मांजा एकुण ३ प्लास्टिक चक्री व एक लाकडी चक्री जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख विरूद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, पोलिस अंमलदार विष्णू गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, संजय तांदळे व महिला पोलिस अंमलदार भंडारे यांनी ही कारवाई केली.















